Breaking-newsमहाराष्ट्र
राज्यात २४ तासांत आणखी ११७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात आणखी ११७ पोलीस कोरोनाबाधित आढळले. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला.
राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १२ हजार ८७७ इतकी झाली आहे. यामध्ये १० हजार ४९१ पोलीस पूर्णपणे बरे झालेले आहेत. तर २ हजार २५५ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १३१ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून दिली आहे.
राज्यातील १२ हजार ८७७ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३५८ अधिकारी आणि ११ हजार ५१९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह) २ हजार २५५ पोलिसांमध्ये ३०५ अधिकारी व १ हजार ९५० कर्मचारी आहेत.





