राज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित;आता टेस्ट आणखी स्वस्त
![# Covid-19: 301 new patients, 2 die in Telangana on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/corona-test-1.jpg)
मुंबई – खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी महाग असल्याने अनेकजण चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. परिणामी संसर्ग वेगाने पसरत जातो.यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कोरोनाच्या चाचणीसाठी आता ८०० ते ६०० रुपयांची कपात केली आहे. प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास बाराशे रुपये, कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन सॅम्पल दिल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
याआधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टसाठी आता जास्तीत जास्त 2800 रुपये इतका दर आकारला जात होता. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता.
भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता 11.70 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी (4,95,51,507) इतका आहे . गेल्या 24 तासात 0देशात 7,20,362 चाचण्या करण्यात आल्या. देशभरात चाचण्यांची गती आणि व्याप्ती वाढवल्यामुळे, केवळ गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या.
व्यापक जागतिक संदर्भाच्या अनुषंगाने, केंद्रसरकारची धोरणे देखील सातत्याने सुधारली आत आहेत. जनतेला दिलासा देण्याच्या अनेक उपाययोजनांपैकी, एक म्हणजे देशात सर्व लोकांना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अलीकडेच, आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करुन पहिल्यांदाच, ‘मागणीनुसार चाचणी’सुविधा देऊ केली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनाही अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी नियमांमध्ये बरीच लवचिकता आणि स्वातंत्र्य देण्यात आले आहे.