राज्यात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 122 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/merlin_168765846_a430c80e-b84d-4ee4-a65e-4adda3f1e353-superJumbo.jpg)
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाव्हायरसचे आणखी 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे.