राज्यात काल ८,३४८ नवे रुग्ण वाढले
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
मुंबई : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल (१८ जुलै) राज्यात ८,३४८ रुग्ण वाढले आहेत. तर, १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईत एका दिवसात काल ११९९ रुग्णांची वाढ झाली असून दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या मुंबईत १,००,१७८ रुग्ण आहेत.
तर, पुण्यात मुंबईपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यात १५८९ रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ११,५९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या मुंबईत ५,६५० मृत्यू आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा एकूण आकड्यानेही ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ३,००,९३७ रुग्ण सापडले. यातले १,२३,३७७ रुग्ण हे सध्या ऍक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत १,६५,६६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ५५.०५ टक्के इतका झाला आहे.