breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यातील 60 तुरूंगांतील 11 हजार कैद्यांना जेलमधून सोडणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-280.png)
महाराष्ट्रासह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळं राज्यातील तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी 11 हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने पेरोलवर सुटका करण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रशासनांना दिले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-49.png)
7 वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरूंगांतील जवळजवळ 11 हजार आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने पेरोल देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत, याबाबतची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.