राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३,३९,२३२ वर
मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक प्रचंड घट्ट होत आहे. राज्यात रविवारी दिवसभरात १८ हजार ५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३८० कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच एका दिवसात १३ हजार ५६५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ वर पोहोचली आहे.
यापैकी आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जण कोरोनामुक्त झाले असून ३५ हजार ५७१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या २ लाख ७३ हजार २२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल २ हजार २६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ९८ हजार ८४६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ७९१ इतका झाला आहे. तसेच सध्या २६ हजार ५९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात रविवारी ३ हजार ३१३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७६ हजार ३२५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ३०० इतका झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ५९९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली.
दरम्यान, रविवारी आढळलेल्या ३ हजार ३१३ नव्या रुग्णांमध्ये १ हजार ५४८ पुणे शहरातील रुग्णांचा समावेश आहे, तर ८१२ रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार १३६ इतकी झाली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ७६ हजार ७९ वर पोहोचली आहे.