राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७,९२,५४१ वर
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
- मुंबईत १,१७९, पुण्यात १,९३३ नवे रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८ लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४१,३८,९२९ चाचण्यांपैकी ७,९२,५४१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ११,८५२ नवे रुग्ण आढळून आले. तर १८४ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७,९२,५४१ एवढी झाली असून कोरोनाबळींचा आकडा २४,५८३ वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १,९४,०५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १,१७९ नवे रुग्ण आढळून आहे. तर ३२ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात ९१७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १,४५,८०५ इतकी झाली आहे. यापैकी १,१७,२६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७,६५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या २०,५५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या १,९३३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,७०,३१४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ४,१३४ इतका झाला आहे. तसेच जिल्ह्यात काल दिवसभरात १,३८४ जण कोरोनामुक्त झाले.