राज्यांची आणि केंद्र शासित प्रदेशांची क्रमवारी जाहीर; महाराष्ट्र 13 व्या स्थानी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/download.jpg)
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने Ease of Doing business अर्थात व्यवसाय करण्यासाठीचे योग्य वातावरण असलेल्या राज्यांची आणि केंद्र शासित प्रदेशांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमारीत आंध्र प्रदेशने पहिले स्थान कायम राखले आहे. उत्तर प्रदेशने १० क्रमांकाची उडी घेत दुसरे स्थान मिळवले. तर तेलंगणाने तिसरे स्थान मिळवले. गेल्या वर्षी तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर होता. पण या वर्षी उत्तर प्रदेशने त्याला मागे टाकले.
या क्रमवारीत गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेले हरियाणा आता १६व्या स्थानावर घसरले. मध्य प्रदेश चौथ्या, झारखंड पाचव्या, छत्तीसगड सहाव्या, हिमाचल प्रदेश सातव्या, राजस्थान आठव्या, पश्चिम बंगाल नवव्या तर गुजरात दहाव्या स्थानावर आहे. क्रमवारीत महाराष्ट्राला पहिल्या १० मध्ये स्थान मिळेल नाही. दिल्लीनंतर म्हणजे महाराष्ट्राचा १३वा क्रमांक आहे. विभागवार विचार केल्यास उत्तर भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम भारतात मध्य प्रदेश, पूर्व भारतात झारखंड, दक्षिण भारतात आंध्र, तर केंद्रशासित प्रदेशांत दिल्ली आणि इशान्य भारतात आसाम पहिल्या स्थानावर आहे.
बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लॅन २०१८-१९ साली राज्यांची क्रमवारी आज जाहीर करम्यात आली. ही क्रमवारी २०१५ साली सुरू झाली होती. याआधी २०१५, २०१६, २०१७-१८ आणि आता २०१८-१९ मध्ये क्रमवारी जाहीर झाली. ही क्रमवारी जाहीर करताना १८१ घटकांचा विचार केला जातो. ज्यात सिंगर विंडो, कार्मचारी धोरण आदींचा समावेश आहे. या क्रमवारीच्या माध्यमातून राज्यातील स्पर्धा वाढवण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्याचा आहे.