Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
राज्यपाल माझ्यापेक्षा वयस्क म्हणून,… असा वाकून नमस्कार : खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/3-19.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राऊत यांनी राज्यपालांना अगदी वाकून नमस्कार केला आहे. काही जाणकारांच्या मते राऊत यांनी उपरोधिकपणे असे केले असावे, असे म्हटले आहे.
मात्र, राज्यपाल माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यामुळे मी असा नमस्कार केला. याव्यतिरिक्त कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करीत आहे, अशी सकारात्मक चर्चा राज्यपाल आणि राऊत यांच्यामध्ये झाली आहे, असे राऊत यांनी सोशल मीडियावर ट्टवीट केले आहे.