गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड अटकेत
![Famous builder Amit Lunkad arrested for defrauding investors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/amit-lunkad.jpg)
पुणे | आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फार्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी अटक केली.
येरवडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी संजय विलास होनराव (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय होनराव यांना अमित लुंकड यांची फार्म असलेल्या लुंकड रियालिटीने गुंतवणुकीवर प्रतिमहिना पंधरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे होनराव यांनी तब्बल 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु लुंकड रियालिटी फर्म कडून होनराव यांना पंधरा टक्के परतावा न देता त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करतात सोमवारी रात्री अमित लुंकड यांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.