यश आपलंच, कार्यकर्त्यांनो जोमाने काम करा – शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/sharad-pawar_0_0-580x373.jpg)
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी सुद्धा त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना आणण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. पुण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, ट्विटरवरुनही यंदाच्या निवडणुकीत विजय आपलाच आहे, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलंच याची खात्री झालीय. कार्यकर्त्यांनो जोमाने काम करा.’
मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी वाटत होतं निवडणूक अवघड आहे, पण आता यश आपलंच याची खात्री झालीय.
कार्यकर्त्यांनो जोमाने काम करा.#पुणे#LokSabhaElection2019 pic.twitter.com/20yDrv1TEB— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 6, 2019
याचबरोबर, यावेळी सत्ताधारी भाजपावर शरद पवार यांनी टीका केली. ‘सत्ताधारी पक्षांकडे सांगण्यासारखं काहीच नाही. फक्त पैसे आहेत. तुम्ही त्यावर लक्ष ठेवा. भाजपाच्या कार्यकर्त्यांना खासगीत सांगा, परत पैसे मिळतील की नाही माहीत नाही, उगाच आता मिळालेले खर्च करू नका’, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा आपण जिंकणार आहोत, यात शंका नाही. पुण्याची निवडणूक नेहमीप्रमाणे चर्चेत असते. कारण देशाला दिशा देणारा हा मतदारसंघ असल्याचे शरद पवार म्हणाले.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1114566829450645504