यंदाही मुलींचीच बाजी! दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Pune-SSC-Board-Result-Shakuntala-Kale.jpg)
पुणे: दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
विभागीय टक्केवारी%
कोकण – 98.77 टक्के
पुणे – 97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार