मुख्यमंत्री आज औरंगाबाद, लोणारच्या दौऱ्यावर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौरा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणारच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील विकास कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज लोणार येथेही दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लोणार भेटीने लोणारकरांच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उद्धव ठाकरे हे आज सकाळी नऊ वाजता औरंगाबाद येथे दाखल होतील. त्यानंतर लोणार सरोवराची पाहणी करणार आहेत.
असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी ८.५५ वा : औरंगाबाद विमानतळ आगमन
सकाळी ९.०० वा : हेलिकॅाप्टरने लोणार
सकाळी ९.३० वा : लोणार आगमन
सकाळी ९.३० ते १०.१५ वा : लोणार सरोवर पाहणी
सकाळी १०.१५ ते १०.४५ वा : लोणार सरोवर संवर्धन व विकासाबाबत सादरीकरण (MTDC विश्रामगृह)
सकाळी ११.४५ वा : औरंगाबाद विमानतळ आगमन
दुपारी १२.०५ वा : औरंगाबाद पाणीपुरवठा योजनांतर्गत दिल्ली गेट जलकुंभ कामांची पाहणी
दुपारी १२.२० वा : जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक
दुपारी १.४५ वा : विमानाने मुंबईकडे प्रयाण