Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत आता शिवसेनेचाच नेता
![Chief Minister Uddhav Thackeray appreciates the war-level work of power supply](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/udhhav-thakrey.jpg)
मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसेनेचाच नेता बसणार, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी केला. आतापर्यंत पालखीचे भोई होतो, पण शिवसेना पुन्हा भोई होणार नाही, असे ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.
शिवसेनेच्या आमदारांना फोडले जाईल, या भीतीने त्यांना मालाड येथील ‘द रिट्रीट’ या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मध्यरात्री हॉटेलवर जाऊन आमदारांशी चर्चा केली होती व तेथेच मुक्काम केला. त्यानंतर उद्धव व रश्मी ठाकरे हे रविवारी दुपारी हॉटेलवर गेले. तेथे त्यांनी आमदारांची बैठक घेतली. या वेळी बोलताना ठाकरे यांनी आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे वचन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे ठाकरे यांनी आमदारांना सांगितले.