मुंबई, कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2-3 दिवस रिमझिम पावसाची शक्यता- IMD
![Mumbai, Konkan and some parts of Maharashtra are likely to receive heavy rains for the next 2-3 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Monsoon_clouds_near_Nagercoil.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची सर बरसत असल्याने अनेकांना महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात थोडे बदल झालेले आहेत. पुढील काही दिवस हे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे राहणार आहेत.
पुढील 2-3 दिवस पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने वातावरण देखील अशाच प्रकारे ढगाळ राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे या भागात पुढील 2-3 दिवस पावसाच्या सरी बरसणार आहेत. मुंबईत काल रात्री आणि आज पहाटे देखील हलका पाऊस शिंपडलेला आहे. मुंबईत रस्ते ओले आहेत. तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभर अशाच प्रकारे हलका पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे.
उत्तर भारतामध्येही मुंबई प्रमाणेच दिल्लीत दाट धुक्यात मागील काही दिवस पाऊस बरसल्याचं चित्र पहायला मिळालेलं आहे. आज सकाळी धुक्यामुळे दिल्ली शहरात रस्त्यावर व्हिजिबिलिटी कमी आहे. तर कश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. मुंबई मध्ये काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागलेली होती. त्यामुळे वातावरणात बदल निर्माण होत थोडा गारवा जाणवत होता. मात्र आता पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण असूनही थंडी जाणवत नाहीये.
आवश्य वाचा- बापरे! औरंगाबादमध्ये अघोरी प्रकार; 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरत शिवलिंगावर केला रक्ताचा अभिषेक