मुंबईसह उपनगरांमध्ये संततधार, राज्यातही जोर कायम
![Rainy season in the state for the next week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/rain.jpg)
मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात पुन्हा एकदा जोरदार पावसाने झाली आहे. पहाटेपासून मुंबई आणि उपनगर परिसराला मागील तासाभरापासून पावसाने झोपडून काढले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात उत्तर आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. एवढेच नाही तर कोकणासह राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर कायम आहे. हळूहळू पावसाने आपला मोर्चा मराठवाड्याकडेही वळवला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवार आणि रविवार मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होताच. रविवार रात्रीपासून पावसाची बॅटिंग पुन्हा सुरू झाली आहे. नालासोपारा भागात पाणी साठल्याचीही माहिती समोर आली आहे.