breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील वडाळा या ठिकाणी इमारतीला आग, १५ जण रूग्णालयात

मुंबईतील वडाळा या ठिकाणी एका इमारतीला आज पहाटेच्या सुमाराला आग लागली. या आगीत १५ जणांचा श्वास कोंडला ज्यानंतर त्यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एएनआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

ANI

@ANI

Mumbai: Fire broke out on 1st floor of Shree Ganesh Sai SRA building near Barkat Ali Naka in Kamla Ram Nagar, Wadala (E), around 3am today. Fire under control. Injured taken to KEM Hospital. Dr Shrikant, CMO KEM Hospital, says,”15 people were admitted, their condition stable now”

See ANI’s other Tweets

मुंबईतल्या वडाळा पूर्व भागात असलेल्या श्री गणेश साई इमारतीत पहाटे साडेतीनच्या सुमाराला आग लागली. आगीचा भडका उडताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे अधिकारी रूग्णवाहिका आणि पाण्याचे टँकर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. २० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पहिल्या मजल्यावर अडकलेलया १५ जणांचा आग आणि धुरामुळे श्वास कोंडला होता.

या १५ जणांना मुंबईतील KEM रूग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्यांवर उपचार सुरू असून या १५ जणांची प्रकृती स्थिर आहे असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button