मुंबई,ठाणे,पालघर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2-7.jpg)
बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा धुमाकुऴ सुरूच आहे. दरम्यान हैदराबादला मागील 2 दोन झोडपल्यानंतर आता या महाराष्ट्रातही जोरदार पाऊस बरसत आहे. काल 14 ऑक्टोबर रात्री मुंबई, पुण्यामध्ये वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांच्यासोबत मुसळधार पाऊस बरसला आहे. आजही काही भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे.
दुपारी हवामान वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजपत्रानुसार आता मुंबई ठाणे , पालघर , सिंधुदुर्ग या पश्चिम किनारपट्टीवरील मुख्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील 24 तासांत अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-39.jpg)
महाराष्ट्रात पुणे, मराठवाडा, उस्मानाबाद, सोलापूर मध्ये मागील काही दिवासांपासून तुफान पाऊस बरसत आहे. ओढ्यांना नदीचे स्वरूप आलं आहे तर धरणांमधूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस बरसत असल्याने नदी काठच्या अनेक गावांना पुराचा वेढा आहे. अति गंभीर परिस्थिती बनलेल्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे. तर इतरत्र नागरिकांना घराबाहेर पडताना सुरक्षेची काळजी घेण्याचं वारंवार आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात यंदा सर्वत्र सरसरीपेक्षा अधिक पासून झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे पण बाजरी, ऊस, सोयाबीन सह अनेक फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.