Breaking-newsमहाराष्ट्र
‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Avinash.jpg)
महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.