Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/temper.jpg)
पुणे – राज्यातील बहुतांश भागातील तापमानात वाढ होत असून परिणामी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशातच कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. मराठवाड्यात पुढील सलग चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात तीन दिवस आणि विदर्भात पाच दिवस उष्णतेची लाट जाणवणार असल्याचे पुणे वेध शाळेने सांगितले आहे.
राज्यासह शहरामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यामध्ये शहरात कमाल तापमान ३६ ते ४० अंशांवर स्थिर होते. दुपारी उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने अनेक जण घराबाहेर पडणे टाळत आहेत.