महामंडळावर गुंडांची नियुक्ती करणाऱ्या फडणवीसांनी राजकीय गुन्हेगारीवर बोलू नये – बाळासाहेब थोरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/balasaheb-thorat-pti-1577371977.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या कुख्यात गुंडाची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीवर बोलू नये, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांचा समाचार घेतला.
थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे संबंध महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव यासारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून त्यांच्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधींचा अवमान करण्याचा प्रयत्न करू नये, असंही थोरातांनी म्हटलं आहे.