Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/railway-track.jpg)
मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना लक्षात आली. त्यानंतर रेल्वेकडून रुळ दुरुस्तीचे काम त्वरीत सुरु करण्यात आले. रुळ दुरुस्तीचे काम करण्यात आले असून पनवेलकडे जाणारी वाहतूक विलंबाने सुरु आहे.