मराठा आरक्षण आंदोलन ; चाकणमध्ये गाड्यांची जाळपोळ, पोलिसांकडून कलम 144 लागू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/856_201807113211.jpg)
पिंपरी – मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारनं वर्षभर कोणतीही हालचाल केलेली नाही. मात्र सरकारसोबत कोणतीही चर्चा करायची नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेत 9 ऑगस्टपर्यंत राज्यभर जनआंदोलन छेडलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून सुमारे एसटी बसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहs. तसेच अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पुणे – नाशिक रस्त्यावरील चाकण येथे आंदोलकांनी रास्ता रोको केले. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठप्प होती. या आंदोलनात जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिका-यांसह एक ग्रामीण पत्रकार गंभीर जखमी झाला आहेत.
चाकण येथील हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे. या आंदोलनात 25 ते 30 गाड्या जाळण्यात आल्या असून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याने सुमारे 30 ते 40 गाड्या फोडण्यात आल्या आहेत.