breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरू, क्रांती मोर्चा आक्रमक
औरंगाबाद – 26 जानेवारी पासून मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार, अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चानं औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे.
25 तारखेला स्थगिती नाही उठली तर 26 तारखेपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि ews आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आलाय. 1 ते 25 जानेवारीपर्यंत राज्यभर आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.