मंदिरात प्रवेश करणा-या ‘त्या’ दोन महिला माओवादी: भाजपचा धक्कादायक आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/2-women-below-50-enter-Sabarimala-temple.jpg)
तिरुअनंतपुरम – शबरीमला मंदिरात दोन महिलांनी बुधवारी प्रवेश केला होता. महिलांच्या मंदिर प्रवेशामुळे हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. केरळातील वातावरण तणावपूर्ण असतानाच केरळच्या भाजप अध्यक्षांनी वादग्रस्त विधान केले आहे. मंदिरात प्रवेश केलेल्या त्या दोन महिला अयप्पाच्या भक्त नव्हे तर माओवादी आहेत. असा धक्कादायक आरोप केरळ भाजप अध्यक्ष व्ही मुरलीधरन यांनी केला आहे.
V Muraleedharan,BJP: Y'day,2 women entered #SabarimalaTemple. They weren't devotees. They were Maoists. CPM with selected policemen prepared an action plan&then saw to it that the women go inside the temple. This is a planned conspiracy by Maoists in league with Kerala govt & CPM pic.twitter.com/mfZQqu35vv
— ANI (@ANI) January 3, 2019
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने षडयंत्र रचून या महिलांना मंदिरात पाठवले. राज्यात अनागोंदी माजवण्यासाठी केरळ सरकार, कम्युनिस्ट पक्ष आणि माओवाद्यांनी मिळून हा कट रचला असाही आरोप व्ही मुरलीधरन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.