Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी : भिवंडीतील दापोडा परिसरात असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वेदांत ग्लोबल वेअर गोडाऊनला ही आग लागली आहे. गोडाऊनमध्ये हायड्रोजन पेरॉक्साडसह इतर केमिकलचा साठा असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वृत्त लवकरच…





