भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल- पृथ्वीराज चव्हाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/raj877.jpg)
- यशवंतराव चव्हाण सेंट्रल लायब्ररी’चे उद्घाटन
कराड : शिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्वागीण प्रगतीमुळे भारत महासत्ता होण्याच्या दिशेने झेपावत आहे. तरी,अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शाखांचे संशोधन करणे ही देशाची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
डॉ.अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिटय़ूटस्च्या डॉ.दौलतराव आहेर अभियांत्रिकीमध्ये यशवंतराव चव्हाण सेंट्रल लायब्ररीचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.अशोकराव गुजर होते, तर संस्थेच्या सचिव डॉ.सौ.माधुरी गुजर,उपाध्यक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर व प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला आदिंची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पायाभूत सुविधांचा अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करावा व प्रभुत्व मिळवावे. विज्ञान तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याने इंग्रजांनी दीडशे वर्षे आपल्या देशावर मुठभर राज्य केले. या इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी विद्यार्थ्यांकरिता कराडचे सुपुत्र, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेली ‘यशवंतराव चव्हाण सेंट्रल लायब्ररी’ ही विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करेल. विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य आकलन करीत, संघटन कार्य करीत, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवावी. गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाबरोबर अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ.अशोक गुजर यांनी जी.के .गुजर ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला यांनी कॉलेज प्रगतीचा आढावा दिला.