भाजप सत्ता स्थापन करणार नाही – चंद्रकांत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/chandrakant-patil-696x364.jpg)
मुंबई – आम्हांला सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाकड़ून निमंत्रण दिलं, पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यावर भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. भाजपने आज कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचाच हे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर त्यांच्याजोडीला कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.