Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भाजप मेळाव्यात तुफान हाणामारी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की
जळगाव – अमळनेरमध्ये भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली आहे.
अमळनेरमधील भाजपच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. अमळनेर येथे भाजपच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्या दरम्यान उदय वाघ आणि बी. एस. पाटील यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. याचे रूपांतर हमाणामारीत झाले. वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र समजू शकलेलं नाही.