भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं
नाशिक – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं हे फक्त शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावणारं असल्याने राज्यभरातून या विधानाचा निषेध केला जात आहे. व्यकंय्या नायडू यांच्या विधानामुळे राज्यभरातील पडसाद उमटताना दिसत आहेत.
नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी अशा आशयाचे पत्र पाठवत या घटनेचा निषेध केला. तसेच नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं. तर पुण्यातही संभाजी ब्रिगेडनं आंदोलन सुरू केलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथविधी नंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जे वक्तव्य केलं हे माझं चेंबर आहे, कुणाचं घर नाही. या विधानावरून राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.