भाजप आमदार राम कदमांना साडी चोळीसह बांगड्याचा आहेर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/rkd_201906248435.jpg)
पंढरपुर – महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारे भाजप नेते आणि आमदार राम कदम यांना पंढरपुरात साडी चोळी आणि हिरव्या बांगड्यांचा अहेर देण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांना असा अहेर देऊन त्यांच्या महिलांप्रतीच्या वक्तव्याबद्दल निषेध नोंदवला आहे.
राम कदम यांना पंढरपुरमधील महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. राम कदम हे पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, भेटीवेळी चक्क बांगड्या आणि साडीचोळीचा अहेर देत त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावेळी राम कदम यांनी काढता पाय घेतल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच बैठक होती, त्यासाठी राम कदम पंढरपुरात आले होते. त्यावेळी, भक्तनिवास परिसरात हा प्रकार घडला.