breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप आमदाराकडून बहिणीचा छळ, विष प्राशन करुन तिचा आत्महत्येचा प्रयत्न

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाचे आमदार उदयसिंग पाडवी यांच्या सावत्र बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केलेेल्या राधा पाडवी यांनी आमदार असलेल्या सावत्र भावाच्या जाचाला कंठाळून आत्महत्या करत असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मंगळवारी दुपारी नंदुरबार जिल्ह्यातील सोमवल या गावी ही घटना घडली आहे. राधा पाडवी यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तळोदा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार उदयसिंग पाडवी यांच्या  सावत्र बहीण राधा कोचरु पाडवी ‍यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. राधा पाडवी यांच्या तक्रारीनंतर तळोदा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. राधा यांच्यावर शासकीय रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

आमदार पाडवी यांनी सावत्र बहीण राधा पाडवी आणि त्यांच्या भावाचे उपजीवीकेचे साधन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार पाडवी हे सावत्र बहीण भावांचे आर्थिक शोषण करत होते. वडिलोपार्जित मालमत्तेतून सावत्र बहीण राधा आणि त्यांच्या भावाला आमदार पाडवी यांनी सत्तेचा गैरवापर करुन बेदखल केले, असा आरोप त्यांच्या बहीणीने केला आहे.

उपजीविकेचे साधन असलेला रॉकेल परवाना पाडवी यांनी बळकावला तसेच वडिलोपार्जित जमीनीवरही त्यांनी ताबा मिळवला आहे. त्यामुळे आमचे जगणे अवघड होऊन बसले, अशी कैफियत राधा पाडवी यांनी पोलिसांत दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button