भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Harshardhan.jpg)
इंदापूर – संपूर्ण राज्यासाठी आनंदाचा उत्सव असणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा मात्र तो कोरोनाची वक्रदृष्टी आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनावेळीचा जल्लोष यावर्षी मात्र पाहायला मिळणार नाही. मात्र असे असले तरी परंपरेनुसार गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होताना दिसत आहेत. राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मधील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी देखील गणपती बाप्पा मंगलमय वातावरणात विराजमान झाले आहेत.
हा आनंदाचा क्षण असून मी नतमस्तक होऊन गणरायाचे स्वागत करतो. दुर्दैवाने मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे. अनेक जण यामध्ये जग सोडून गेले आहेत. त्यांच्या कुटूंबाला दुख:तून सावरण्याची शक्ती गणरायाने द्यावी. सर्वांना सुखी समाधानी ठेवावे. पुढील काळात आपणाला जास्तीची काळजी घ्यावी लागणार आहे. यास धैर्याने तोंड देता यावे एवढीच प्रार्थना ‘गणराया चरणी’ अशी भावना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.