बेघर नागरिकांसाठी ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ ची योजना – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-274.png)
सध्या देशातील लॉकडाऊन निर्णयामुळे जे बेघर , रस्त्यावर राहणारे लोक त्यांची मात्र गैरसोय झालेली पहायला मिळतेय़…खायला अन्न नसल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे..त्यावर उपाय म्हणून काही ठिकाणी पोलिस आपलं कर्तव्य चोख बजावताना पहायला मिळतायत…अनेक ठिकाणी पोलिसांनी अशा बेघर आणि रस्त्यावर राहणा-या गरिब लोकांना खाण्याचे सामान , पाणी देऊन त्यांना मदत केली आहे…एवढच नाही तर, सॅनिटायझरचाही पुरवढा केला आहे…
त्याचप्रमाणे आता शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे.
त्याच पार्श्वभुमिवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील ‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.