breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बापरे! बीड रस्त्यावर तरूणाचा हवेत बेधुंद गोळीबार

जामखेड | महाईन्यूज

शहरातील बीड रोडवर जुन्या वादातून अठवडी बाजारा दिवशीच सकाळी दहा वाजता भरदिवसा एकाने हवेत गोळीबार केलेला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन एका संशयितास ताब्यात घेतलेले आहे. जामखेड शहराचा आठवडी बाजार शनिवारचा या बाजार दिवशीच एका कापड दुकाना समोर जुन्या वादातून हा गोळीबार झाला आसल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित आरोपीचे आणि समोरील गटाचे वाद निर्माण झाला होता. हा वाद शनिवार दि २९ रोजी अठवडी बाजार दिवशीच पुन्हा उफाळून आला आहे.

एका युवकाने हवेत गोळीबार केला यामध्ये सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह गोळीबार झाला त्या ठिकाणी भेट दिली. या वेळी बघ्याची एकच गर्दी जमली होती. गोळीबार झालेला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असुन त्या दुष्टीने पोलीस तपास करीत आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयितास माहितीसाठी ताब्यात घेतले आहे. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. गेल्या दोन वर्षापुर्वी याच बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आसल्याने कायदासुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आसल्याचे चित्र दिसत आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button