फलटणमध्ये शरद पवार यांच्या सभेत शेखर गोरे यांचा गोंधळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/shekhar-gore-1.jpg)
फलटण – माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे स्वत: निवडणुकीस उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत असताना शेखर गोरे यांनी गोंधळ घातला.
गोरे हे पवार यांचे भाषण सुरू असतानाच मंचावर गेले आणि त्यांनी पवारांना रोखत त्यांचे म्हणणे मांडण्यास सुरूवात केली. गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांच्याबद्दल आक्षेप नोंदवला. गोरे यांच्याबद्दल आपल्याला कुठलीच अडचण नाही. पण त्यांनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणात पडू नये, असे मत पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
हा अंतर्गत वाद आहे. मला पवारसाहेबांपर्यंत पोहोचू दिले जात नाही. पक्षाचे आदेश मला सांगितले जात नाहीत. पवारसाहेबांबाबत मला आदर आहे. पण प्रभाकर देशमुख यांनी अंतर्गत राजकारणात पडू नये, असेही गोरे यांनी म्हटले. गोरे यांच्या या प्रकारासमोर सर्वचजण हतबल झाले होते.
- काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे शेखर हे भाऊ आहेत. मध्यंतरी शेखर गोरे यांच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. नंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. शेखर गोरे यांच्या या कृत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.