प्रभादेवी येथील उच्चभ्रू इमारतीतील वेश्याव्यवसाय उद्ध्वस्त
![Exposed prostitution under the name of Spa Center at Hinjewadi IT Park](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Sex-rackeT-Frame-copy-2.jpg)
मुंबई | महाईन्यूज
प्रभादेवी येथील उच्चभ्रू इमारतीत ‘स्पा’आड सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत नऊ तरुणींची सुटका करण्यात आली असून, ‘स्पा’चालक तरुणी आणि मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या इमारतीच्या तळमजल्यावर ‘रेजुन्वा स्पा’ असून तेथे संध्याकाळी पाचच्या सुमारास अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे आणि पथकाने छापा घातलेला आहे.
मसाज किंवा अन्य सेवांआड या स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जातो, अशा तक्रारी मुंबई पोलिसांकडे येत होत्या व त्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेश्याव्यवसायात ओढण्यात आलेल्या नऊ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर ‘स्पा’ चालविणाऱ्या तरुणीला फौजदारी दंड संहितेतील तरतुदीनुसार नोटीस जारी करून शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. धाड पडली तेव्हा केंद्राचा मालक सलीम शेख पसार झाला होता त्याला रात्री उशिरा दादर पोलिसांनी अटक केलेली आहे.