Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
पुण्यात आर.आर. आबांच्या कन्येचा उद्या विवाहसोहळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/पाटील.jpg)
पुणे- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील आणि उद्योजक आनंद थोरात यांचा विवाहसोहळा उद्या (1 मे) सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटी येथे संपन्न होणार आहे.
आनंद थोरात हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आहेत. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियातून शिक्षण घेतले असून ते सध्या पुण्यात व्यवसाय सांभाळत आहेत. आर.आर.आबा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी नेते. त्यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या कुटूंबाकडे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे म्हटले होते. आबांना दोन मुली व एक मुलगा आहे. हे सर्व महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी स्वत: या विवाहसोहळ्यात लक्ष घातले आहे.