breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात आज ड्रंक अँड ड्रायव्हची होणार मोठी कारवाई…

पुणे | महाईन्यूज |

आता काहीच तास उरलेत जुन्या वर्षाला बाय-बाय नविन वर्षाला वेलकम म्हणण्यासाठी. सर्वजन सज्ज झालेत नविन स्वर्षाचं स्वागत करण्यासाठी..मात्र त्याचबरोबर आज ३१ डिसेंबरला पुणे पोलीस रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात ड्रंकन ड्रायव्हिंग चाचण्या घेणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी नागरिकांना दिली आहे. नविन वर्षाचं स्वागत करताना करत असलेल्या एन्जॉयला गालबोट लागू नये त्यासाठी पोलिसही सतर्क आहेत.

१३० पेक्षा जास्त ठिकाणी स्थिर, चलित आणि साध्या वेशातील पोलिसांचे गट चाचण्या घेतील. या संपूर्ण चाचण्यांचे छायाचित्रण आणि चलचित्रण केले जाईल. डीडी चाचण्यांमध्ये दोषी ठरलेली सर्व वाहने तिथल्या तिथे जप्त किंवा ताब्यात घेतली जातील.

नवीन वर्षाची पार्टी करणाऱ्या सर्वांना डीडीपासून दूर राहाण्याची विनंती करतो, असही आवाहन पोलीस आयुक्तांकडून पुणेकरांना करण्यात आले आहे. २०१९ मध्ये मद्यधुंद चालकांविरुद्ध अनेक केसेस झाल्या आहेत. तसेच दुर्दैवाने डीडीमुळे अनेक जीवघेणे अपघातही झाले आहेत.

डीडी डेटा हा नोकरीचे व्हेरिफिकेशन, व्हिसा आणि पासपोर्ट इ. शी जोडलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना अशा प्रकरणात जर कारवाई झाली तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही आयुक्तांकडून देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button