Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पुण्यातील चार तर लातूरातील सत्तर विद्यार्थी “सौ प्रतिशत’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/ssc-hsc-exams-.jpg)
पुणे – राज्यात मागील वर्षी एकूण 193 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते त्याप्रमाणे यंदा ही संख्या कमी झाली असली तरीही राज्यातील 125 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यामध्ये पुण्यातील केवळ चार विद्यार्थी आहेत. तर लातूरात सर्वाधिक म्हणजेच 70 विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मंडळनिहाय
पुणे – 4
नागपुर – 2
औरंगाबाद – 23
मुंबई – 4
कोल्हापूर – 11
अमरावती – 6
नाशिक – 1
लातूर – 70
कोकण – 4
एकूण – 125