पुणे जिल्ह्याचा निकाल 92.99 टक्के
- सोलापूरचा निकाल 92.27 तर अहमदनगरचा निकाल 90.30
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा पुणे जिल्ह्याचा निकाल 92.99 टक्के लागला आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.27 व अहमनगर जिल्ह्याचा निकाल 90.30 टक्के लागला असून पुणे विभागीय मंडळात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्याचा निकाल 92.74 टक्के लागला होता. यंदा 0.25 टक्क्यांनी जिल्ह्याच्या निकालात वाढ झाली आहे.
पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, अहमनगर व सोलापूर जिल्ह्यातून एकूण 2 लाख 68 हजार 88 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 46 हजार 855 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 92.08 टक्के आहे. यामध्ये मुलांचा निकाल 90.20 टक्के आहे तर मुलींचा निकाल 94.40 टक्के आहे.
सबंधित वृत्त :
दहावीचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 89.41 टक्के, दहावीतही मुलींचीच बाजी
पुण्यातील चार तर लातूरातील सत्तर विद्यार्थी “सौ प्रतिशत’
दहावीच्या परीक्षेत कलागुणांचा लाभ घेणारे विद्यार्थी चक्क 1 लाख 66 हजार 171