परवान्याचे वर्षभरात नूतनीकरण बंधनकारक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/licence.jpg)
नव्या वाहन नियमावलीमुळे प्रवासी आणि मालवाहतूकदारांसमोर डोकेदुखी
मुंबई : वाहनचालक परवान्याची वैधता संपल्यास एक वर्षांच्या आत त्याचे नूतनीकरण करा, अन्यथा पुन्हा चाचणी द्या, अशी अट प्रवासी आणि अवजड मालवाहतूकदारांसाठी नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्यात घालण्यात आली आहे. यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच (आरटीओ) चालकांना मोटर ड्रायव्हिंग स्कूलकडूनही पाच किलोमीटरची चाचणी द्यावी लागणार आहे. या अटीला मालवाहतूकदार व प्रवासी बस संघटनांनी विरोध केला आहे.
प्रवासी आणि अवजड मालवाहतूक वाहनचालकांच्या परवान्याची वैधता तीन वर्षे होती. वैधता संपल्यानंतरही दोन वर्षांपर्यंत नूतनीकरणाची मुभा होती. नूतनीकरण करताना त्या चालकाला फक्त आरटीओत येऊन चाचणी द्यावी लागत होती.
मात्र आता नवीन नियमानुसार परवान्याची वैधता ही पाच वर्षांची करण्यात आली आहे. वैधतेचा कालावधी जरी वाढवला असला तरी नूतनीकरणासाठी मात्र अजब अट घालण्यात आली आहे.