नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे
![Health department exams will be held, possible dates announced by Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/images_1585299288869_rajesh_tope.jpg)
जालना – पंतप्रधानांनी लसीकरणाबद्दलचा मौलिक संदेश देशाला दिला आहे. आरोग्यमंत्री म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांनी लसीकरण करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. कोरोना लसीकरणात सर्वांचाच नंबर लागेल, कुणीही काळजी करण्याची गरज नाही, असंही टोपे म्हणाले.
वाचा :-आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत- मुख्यमंत्री
सर्वांना वाटतं की लस मिळावी, मात्र, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य माणसांचा क्रमांक आल्यावर लस घेणार, प्राधान्यक्रमानुसार जेव्हा लस मिळेल तेव्हा लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.लसीकरणाची गरज आहे, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. 8 लाख 50 हजार जणांची नोंदणी केली आहे. त्यामुळे 17 लाख 50 हजार डोस मिळणं गरजेचे आहे. राज्याला उर्वरित 7.5 लाख डोस मिळणं गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहीणार आहे.