Breaking-newsमहाराष्ट्र
निवडणुकीत पैसे वाटप ; राष्ट्रवादीच्या माजी महापाैरांसह चाैघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/201807290626064263_Case-filed-against-4-NCP-candidate-for-offering-money-in_SECVPF.jpg)
सांगली महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पैसे वाटप करणाऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ उमेदवारांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मिरजच्या प्रभाग ६ मधील जवाहर चौक येथे एका घरात शिवकुमार जिगजिनी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांनी या घरावर छापा टाकला असता, याठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार यांच्या नावाचे डमी बॅलेट मशीन, रोख ५५ हजार ८०० रुपये तसेच मतदार नोंद असलेल्या २९ चिठ्ठया आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त करत या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक अत्ताहर नायकवडी, नर्गिस सय्यद, राजिया काझी या चार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह पैसे वाटप करणाऱ्या शिवकुमार जिगजिनी या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पैसे वाटप प्रकरणी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.