नाशिक महापालिकेत शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग
![Shiv Sena group leader's office on fire in Nashik Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/१०१०.jpg)
नाशिक – नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. धुराचे लोट पसरले आहेत.
वाचा :-कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम- शरद पवार
घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, कर्मचारी आणि अधिकारी सामान बाहेर आणण्याचं काम सुरु आहे, मात्र सुदैवाने कार्यालयात कुणीही नसल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पालिका कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या रुमचे दरवाजे तोडलेले, आग्निशामक दलाचे जावान घटनास्थळी पोहोचले, सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही, नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु, असे पालिका कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.