नागपूरमध्ये प्रियकराने भर चौकात प्रेयसीला जिवंत जाळलं
![In Nagpur, the lover burnt his girlfriend alive in Bhar Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/प्रेयसीला-जिवंत-जाळलं.jpeg)
नागपूर – प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेने नागपूर हादरले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ही भयंकर घटना घडली. दरम्यान, आगीत होरपळलेल्या प्रेयसीने उपचारादरम्यान प्राण सोडले. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. यावेळी संतापलेल्या प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबानाच्या अंगावर टाकले. तो शबाना यांना पेटवून घटनास्थळाहून पसार झाला. प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवून तातडीने शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी शबाना यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.