नांदेडमध्ये बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Nanded-Bal-Tapaswi-Nirvanrudra-Pashupatinath-Maharaj-Murder.jpg)
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणामध्ये बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दोन वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गावातीलच एका माथेफिरु तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करुन त्यांच्याजवळील ऐवज लुटला, आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे
आरोपी हा महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारी जागे झाले, त्यामुळे आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. महाराजांचे पार्थिव उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. भाविकांना याविषयी माहिती समजताच एकच खळबळ उडाली.
मठात आणखी एकाचा मृतदेह
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली, त्याच मठातील बाथरुममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. उमरी तालुक्यातील चिंचाळामध्ये राहणाऱ्या भगवान शिंदे यांचा हा मृतदेह असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे. पालघर मध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरुकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.