breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवलेवाडीच्या राष्ट्रवादी उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

सातारा : घडळ्याचे बटन दाबले की मत कमळला जाते अशी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याने नवलेवाडी (ता. खटाव) येथील दीपक रघुनाथ पवार यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात अखदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद केंद्राध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान नवलेवाडी येथील मतदान मशिनबाबतच्या तक्रारीबाबत राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे या मतदान केंद्रावरील प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केले आहे.

नवलेवाडीत लोकसभेच्या मतदान यंत्रात कोणतेही बटन दाबले, तरी मत कमळाला जात होते. याबाबत आमदार शशिकांत शिंदेंसह अनेकांनी आक्षेप घेतला. यावरून मतदान यंत्र बंद करून ते सील केले होते. त्यानंतर दुसरे मतदान यंत्र लावून मतदान प्रक्रिया सुरू झाली. याबाबत प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचे कोरेगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी नलावडे यांनी खंडन केले आहे. संबंधितांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून, अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे म्हटले आहे.

नलावडे म्हणाल्या की मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी नवलेवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक 250 मध्ये सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार व दिलीप आनंदराव वाघ हे अभिरूप मतदानावेळी उपस्थित होते. अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्याबाबत सांगितले. तथापि त्यांनी तसे करण्यास नकार दिला. तद्‌नंतर या मतदान केंद्रावरील प्रक्रिया सुरळीत सुरू होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button