breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

धारावी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे

२६ हजार कोटी रुपयांच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी अंतिम विकासक निश्चित करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. दुबईस्थित ‘सेक-लिंक‘ कंपनीच्या  निविदेवर सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीयरीत्या कळते. या प्रकरणी आता राज्य शासनाकडून  लवकरच घोषणा केली जाणार आहे.  धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जागतिक पातळीवर निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत दुबईस्थित सेक-लिंक आणि अदानी इन्फ्रास्ट्रक्चर या दोनच निविदा दाखल झाल्या होत्या. या दोन्ही निविदा गेल्या बुधवारी उघडण्यात आल्या. त्यापैकी सेक-लिंकने ७५०० कोटी तर अदानी इन्फ्रास्ट्रक्चरने ४,५०० कोटी रुपये नमूद केले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button