Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘तुमच्या पक्षातील नेत्यांना आवरा’, महिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/3-2.jpg)
नवी दिल्ली –
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची या विरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिलांना हिंसक धमक्या देणाऱ्या तुमच्या पक्षातील नेत्यांना आवरा, अशी मागणी देशातील डझनभर महिला संघटना आणि विविध क्षेत्रातील नामवंत महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून केली आहे.
दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी महिलांच्या विरोधात एक दहशतीचे वातावरण तयार केले आहे, अशी कैफियत त्यांनी या पत्रात मांडली आहे. सुमारे १६२ महिलांनी या पत्रावर सह्या केल्यात. तुम्ही भाजप नेते असलात तरी या देशाचे पंतप्रधान आहात तेव्हा तुम्ही महिलांच्या सुरक्षेची हमी द्यावी असं आवाहनही या पत्रातून करण्यात आलंय.